बीड : सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांचा ठिय्या | पुढारी

बीड : सासरच्यांनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांचा ठिय्या

गेवराई; पुढारी वृत्तसेवा: विवाहितेने स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सदर प्रकार आत्महत्येचा नसून सासरच्या लोकांनी तिची हत्या केल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. सासु सासऱ्यांना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी नातेवाईकांनी गेवराई-शेवगांव रस्त्यावरील उमापूर फाट्यावर आज (दि.१) तासभर ठिय्या मांडला होता.

गेवराई तालुक्यातील नरसिंह तांडा येथे रविवारी अंजली सुनिल राठोड या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. मात्र, नातेवाईकांनी दुपारी उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. तिचा सासरकडून सतत छळ केला जात होता. घटनेनंतर मुलीची सासू, सासरे आणि भाया फरार झाले आहेत. त्यांनीच आपल्या मुलीला जिवे मारल्याचा आरोप करत विवाहितेच्या आई वडिलांनी व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेता गेवराई-शेवगांव रस्त्यावर तासभर ठिय्या मांडला.

अखेर डीवायएसपी स्वप्नील राठोड यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक भास्कर नवले, डिगांबर पवार, अमोल येळे, घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, या प्रकरणातील मयत महिलेचा पती सुनिल राठोड यानेही रविवारी विष घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button