हिंगोली : जयपूर येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

हिंगोली : जयपूर येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे एका शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.३०) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली आहे. शेतात काम करताना अचानकपणे विजेच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. या दरम्यान ही घटना घडली आहे.

श्रावण मास सुरू होताच सेनगाव तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजता पासून मुसळधार पाऊस सुरू होता. तब्बल तीन तास पाऊस झाला. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.३०) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विजा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. दीडच्या दरम्यान जयपूर येथे वीज कोसळून नागनाथ दत्तराव पायघन वय (वय ३५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

मागच्या दोन आठवड्यापासून तालुक्यात सततधार पाऊस पडत आहे. शनिवारी पहाटे पावसाने उघडीप दिल्याने नागनाथ पायघन हे आपल्या शेतात काम करत होते. मात्र दुपारी वादळी वाऱ्यासह विजाच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतात काम करीत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. परिसरातील नागरिकांना ही घटना लक्षात येताच त्यानी जखमी झालेल्या नागनाथ पायघन यांना रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जयपूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button