पैठण : गोदावरी नदीपात्रात एकाचा मृत्यूदेह आढळला  | पुढारी

पैठण : गोदावरी नदीपात्रात एकाचा मृत्यूदेह आढळला 

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीपात्रात अज्ञात ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. एकापाठोपाठ पैठणमध्ये मृत्यूदेह आढळून येण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अधिक माहिती अशी की, पैठणमध्ये दोनच दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर आता बुधवारी (दि.२५) रोजी दुपारी संत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागे असलेल्या गोदावरी नदीपात्रात अज्ञात इसमाचे कुजलेल्या अवस्थेत मृत्यूदेह पाण्यात तरंगत असल्याचे दिसले.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक किशोर पवार, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे व पोलिस पथकासह घटनास्थळी भेट दिली आहे.

सदरील मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आहे. या इसमाच्या अंगात विटकरी रंगाचा बनियन व काळ्या रंगाची पॅंट, दाढी वाढलेली आहे. ओळख पटवण्याचे काम पैठण पोलिस करीत असून ओळख पटल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय

हे वाचलंत का? 

Back to top button