बीड: नाथसागरातून विसर्ग सुरूच; पांचाळेश्वर येथील श्रीदत्त, राक्षसभुवनचे शनिमंदिर पाण्यात | पुढारी

बीड: नाथसागरातून विसर्ग सुरूच; पांचाळेश्वर येथील श्रीदत्त, राक्षसभुवनचे शनिमंदिर पाण्यात

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील जायकवाडी धरणातून मंगळवारी नदीपात्रात पाणी सोडले. त्यामुळे गेवराई तालुक्यातील पंचाळेश्वर येथील तीर्थक्षेत्र भगवान दत्तात्रयांचे भोजनस्थान आत्मतीर्थ हे पाण्यात बुडाले. तर तीर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनी मंदिरांसह महाराजांची मूर्ती पाण्यात बुडाली. त्यामुळे भाविकांसाठी येथील दर्शन बंद करण्यात आले आहे. दरम्यान, आज (दि.२७) सकाळी पुन्हा विसर्ग वाढवून ३० हजार क्युसेक पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना तहसीलदार सचिन खाडे यांनी दिल्या आहेत.

नाथसागरातून पाणी सोडण्यात आले असले, तरी गोदावरी नदीवरील बंधारे यापूर्वीच भरले असल्याने गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे गोदाकाठावरील आपापल्या गावांत दवंडीद्वारे नागरिकांना, शेतकर्‍यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोणतीही जीवित, वित्तहानी होणार नाही, याची वेळोवेळी खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी सतर्क राहून वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार खाडे यांनी केले आहे.

हेही वाचलंत का ?  

Back to top button