जालना : जाफराबाद पं.स.च्या उपसभापतींचा मृतदेह पैठण येथे आढळला | पुढारी

जालना : जाफराबाद पं.स.च्या उपसभापतींचा मृतदेह पैठण येथे आढळला

जालना; पुढारी वृत्तसेवा : जाफराबाद पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप विलासराव मुळे (वय ३७) यांचा मृतदेह पैठण येथील पाचोड रोड लगत असणाऱ्या विहीरमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील जाफराबाद पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप विलासराव मुळे हे बुधवारी (दि. १८) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सिल्लोड म्हणून घराच्या बाहेर पडले. तेव्हापासून ते अचानक बेपत्ता झाले होते. याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती.

नातेवाईक व मित्रमंडळी प्रदीप मुळे यांचा शोध घेत होते. दरम्यान सोमवारी (दि. २३) दुपारी पैठण येथील पाचोड रोड लगत असलेल्या रवी भुकेले यांच्या शेतातील विहीरीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचे माहिती पैठण पोलीस ठाण्याला मिळाली.

पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी उपनिरीक्षक रामकृष्ण सागडे, उपनिरीक्षक अरविंद गटकुळ यांनी घटनास्थळी दाखल होत प्रदीप मुळे नातेवाईकाच्या उपस्थित मृत्यूदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. अखेर हा मृतदेह प्रदीप मुळे यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Back to top button