जालना : ‘दुल्हन दुपट्टा’ ठरतोय ट्रेंडी, ट्रेंड वाढला | पुढारी

जालना : 'दुल्हन दुपट्टा’ ठरतोय ट्रेंडी, ट्रेंड वाढला

जालना, पुढारी वृत्तसेवा ःएखाद्या चित्रपटात अथवा बॉलीवूडमध्ये अभिनेत्रीने केलेली हेअरस्टाइल, ड्रेस हे आजकाल लोकप्रिय ठरत आहे. यूथमध्ये या स्टाइलची मोठी क्रेझ आहे. सध्या दीपिका पदुकोनसह अनेक अभिनेत्रींनी आपल्या लग्नात घातलेला घागरा व त्यावर घेतलेला दुल्हन दुपट्टा हा ट्रेंडी झाला आहे. प्रत्येक नवरी आपल्या लग्नात वर्कचा दुपट्टा घेत असते. मात्र, सध्या सदा सौभाग्यवती भव असे लिहिलेल्या दुपट्ट्याला मागणी वाढली आहे. दुल्हन आपल्या लग्नात याच दुपट्ट्याला पसंती देत आहे.

सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. घरातल्या आणि रोजच्या जीवनातून नटण्या-सवरण्यासाठी एक संधी मिळते. लग्नाच्या तारखेपासून कितीतरी महिने आधी कुटुंब आणि मित्र -मैत्रिणींचे प्लॅनिंग सुरू होते. मुलीकडची लोकं खाण्यापिण्याची आणि पाहुण्यांची सरबराई करण्याची जबाबदारी उचलत असतात, तर मुली आपल्या वेडिंग ड्रेसेसमध्ये गुंतून जातात.

लग्नातील प्रत्येक फंक्शनसाठी आपला ड्रेस, मेकअप, फुटवेअर आणि अ‍ॅक्सेसरीज प्लॅन करण्यासाठी मुली लग्न ठरल्यापासूनच तयारी सुरू करतात. प्रत्यके मुलीचे स्वप्न असते की, ती लग्नात सुंदर दिसावी. इतरांपेक्षा वेगळा लूक करण्यावर दुल्हनचा कल असतो. यासाठी सध्या ट्रेंडी काय आहे, याकरिता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यातच ऑनलाइन शॉपिंगमुळे तर नवीन ट्रेंडी वस्तू सहज घरी मिळवू शकत आहे. सध्या अशाच वस्तूला मागणी आहे.

‘सौभाग्यवती भव’चा संदेश

सध्या लग्नात फक्त दुपट्टाच नाही तर बांगड्या, लटकन हेदेखील वेगळा मेसेज लिहून तयार केले जात आहेत. लग्न म्हणजे आयुष्यातील सर्वांत सुंदर असा क्षण असल्याने त्याला स्पेशल बनवण्यासाठी नवरीचा प्रयत्न असतो. यासाठी सध्या बांगड्या व लटकनवरही सौभाग्यवती भव असा संदेश लिहिलेला दिसून येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button