अंधारी : शेतकर्‍याने दीड एकरातील टोमॅटो पीक उपटून फेकले | पुढारी

अंधारी : शेतकर्‍याने दीड एकरातील टोमॅटो पीक उपटून फेकले

अंधारी, पुढारी वृत्तसेवा : येथील दीड एकरातील टोमॅटो पीकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने ते वाळून जात होते, त्यामुळे शेतकर्‍याने ही झाडे उपटून फेकून दिले.

अंधारी परिसरातील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केलेली आहेत. परंतु या पिकावर ऐन फुलार्‍यात येताच अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उभी झाडे वाळून जात असल्याने परिसरातील शेतकरी काळजीत आहेत. महागडी बी बियाणे, औषधी खर्च करूनदेखील नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहेत.

अंधारी येथील शेतकरी योगेश भानुदास गोरे यांनी दीड एकर टोमॅटोची लागवड केली. या पिकास महाग औषधांची फवारणी केली. टोमॅटोचे पीक फुलोर्‍यात असतानाच मागील आठवड्याभरापासून विविध उपाययोजना करूनही शेतातील उभी झाडे ठिकठिकाणी वाळून जात असल्याने त्यांनी बुधवारी (दि.6) दीड एकर शेतातील टोमॅटो पीक उपटून टाकले आहेत. या पिकावर त्यांचा जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च झाला होता.

हेही वाचलंत का? 

Back to top button