आईचा खून करून पळून जाणाऱ्या मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

आईचा खून करून पळून जाणाऱ्या मुलास पोलिसांनी घेतले ताब्यात

नेकनूर ; पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत आपल्या हातून आईचा खून झाल्याचे लक्षात येताच पळून चाललेला मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. आईचा खून करुन पळून जाणार्‍या संशयितआरोपी मदन पांडुरंग मानगिरे (वय २८) याला दीड तासाच्या थरारानंतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी ताब्‍यात घेतले.

चौसाळा येथील प्रयागबाई पांडुरंग मानगिरे (वय ७०) या महिलेचा मुलानेच खून केल्याची माहिती नेकनूर पोलिसांना मिळाली.

पीएसआय विलास जाधव हे घटनास्थळी दाखल झाल्यावर संशयित आराेपी पसार झाल्‍याचे समोर आले.

यावेळी बीड, गेवराई मार्गे महाकाळ येथे सासुरवाडीकडे संशयित आरोपी मदन मानगिरे पळून जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतःच्या खासगी वाहनाने त्याचा पाठलाग करत शहागडजवळ त्याला ताब्यात घेतले.

आरोपी सोबत लहान मुलगा होता त्यांना नेकनूर पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले आहे.

मृत महिला दारू पीत असल्याचे बोलले जात असून, याला विरोध करीत मुलाने मारहाण केल्याच्या बोलले जात आहे.

शवविच्छेदन अहवालानतर गुन्हा नोंद केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button