आखाडा बाळापूर येथे ५० हजारांची अवैध दारू जप्त | पुढारी

आखाडा बाळापूर येथे ५० हजारांची अवैध दारू जप्त

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : दांडेगाव तालुका कळमनुरी येथील कॅनॉलच्या काठावर अवैध दारूच्या विक्रीसाठी दबा धरून बसलेल्या दोन युवकांकडून ५० हजार रुपयांच्या किमतीच्या देशी-विदेशी बाटल्या आणि एक मोटरसायकल जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोलले व पोलीस जमादार राठोड व शेख बाबर यांनी केली आहे.

दांडेगावच्या कॅनॉलवर एका मोटरसायकलवरून दोघेजण अवैध दारू विक्रीसाठी आणत असल्याची गुप्त माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भोंडले व त्यांचे सहकारी यांनी कॅनॉलच्या काठावर बसलेले गोविंद फकीरा राठोड (रा. रामेश्वर तांडा) आणि एकनाथ भारत नरवाडे (रा. पार्टी) या दोघांना अटक केली.

यावेळी त्यांच्याकडून ५० हजार रुपयांची अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच त्याच्याकडील एक मोटारसायकल (क्रमांक एमएच 26 एपी 6505) जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button