जालना : गॅस गळतीने घराला आग | पुढारी

जालना : गॅस गळतीने घराला आग

विरेगाव, पुढारी वृत्तसेवा ःजालना तालुक्यातील डुकरी पिंपरी फाटा येथील प्रकाश साहेबराव जाधव यांच्या घराला गॅस गळती होऊन आग लागली. यात 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रकाश जाधव हे शुक्रवारी सकाळी जालन्याला गेले होते. त्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आग विझवण्यासाठी गौतम जाधव, चंद्रकांत जाधव, विकास जाधव, कदिर सय्यद यांनी प्रयत्न केले. अग्नीशामन दलाच्या बंबाने आग विझवली. आगीत बी-बियाणे, संसारोपयोगी साहित्य, फ्रिज, कपाट आदी 7 ते 8 लाख रुपयांचे साहित्य जळाल्याची माहिती प्रकाश जाधव यांनी दिली.

जालना अग्निशमन विभागाचे कर्मचारी तायडे, फायरमन नितेश ढाकणे, रवी बनसोडे, विठ्ठल कांबळे, सादिक आली यांनी ही आग विझवली. यावेळी ग्रामसेवक अमरदीप डोइफोडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button