परभणी : गणेशपूर नजीक ट्रक पलटी होऊन चालक जखमी | पुढारी

परभणी : गणेशपूर नजीक ट्रक पलटी होऊन चालक जखमी

चारठाणा : पुढारी वृत्तसेवा : चारठाणा – गणेशपूर दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्याच्या साईड कट्ट्यावरुन एक ट्रक घसरल्याने पलटी होऊन चालक जखमी झाला आहे. हा अपघात बुधवार दि. २९ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास घडला. पिंपरी ते मंठा या रस्त्यावर सध्याला काम सुरु असल्याने रस्त्यावर टाकलेल्या मुरुमामुळे पावसामुळे जागोजागी चिखल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ट्रक क्रमांक एम. एच. २६ बि. ई. १५९२ पिंपरी येथून गणेशपूर पाटीकडे जात असताना या मार्गावर सुरु असलेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्यावरुन ट्रक घसरला. ट्रक पलटी होऊन चालक योगेश रुस्तुम गिते (वय २५, रा.) जखमी झाले आहेत.

जखमीवर जालना येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. मागील दोन दिवसांपूर्वी या परिसरात पाऊस झाला आहे. मुरूम माती असल्याने या ठिकाणी दल- दल झालीय. मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाळ्यात हा रस्ता वाहन धारकांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे चित्र आहे.

Back to top button