लातुरात पतीने पत्नीचा गळा चिरला | पुढारी

लातुरात पतीने पत्नीचा गळा चिरला

लातूर, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ कारणावरून एकाने त्याच्या पत्नीचा गळा चिरून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला व स्वतः फाशी घेण्याचा प्रयत्नात असताना त्याला तेथील नागरिकांनी वाचवले. प्रवीण जाधव (वय 26) असे त्याचे तर अंकिता (वय 24) तिच्या पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी प्रवीण विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जखमी पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोना नगर भागात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, येथील सोना नगरातील अंकिता हीचा विवाह वर्षभरापूर्वी प्रवीण जाधव याच्याशी झाला होता. ते दोघेही पुण्यात राहत होते. प्रवीण हा त्याच्या पत्नीस किरकोळ कारणावरून जाच करत होता. स्वयंपाक येत नाही अशी व अन्य कारणे पुढे करून तो
तिला मारझोड करत असे. काही दिवसापूर्वी ते पुण्याहून लातूरला राहायला आले होते. मंगळवारी सायंकाळी प्रवीण मद्यपान करून घरी व आला दोघात कुरबुर झाली.

यावेळी त्याने पत्नी अंकिताच्या गळ्यावर बतईने वार केले यात ती गंभीर जखमी झाली .आरडाओरडा होत असल्याने शेजारी धावले व त्यांनी अंकिताला उपचारार्थ दवाखान्यात पाठवले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी घटनास्थळाची
पाहणी केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button