औरंगाबाद : साडेतीन महिन्यांनंतर शहरात कोरोनाचा बळी | पुढारी

औरंगाबाद : साडेतीन महिन्यांनंतर शहरात कोरोनाचा बळी

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने धास्ती निर्माण झाली होती. मात्र, रविवारी (दि. 26) साडेतीन महिन्यांनंतर कोरोनाचा बळी गेल्याने सुस्तावलेली आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दिवसभरात 16 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तब्बल 114 वर पोहोचल्याने चिंता वाढली आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालल्याने चौथ्या लाटेचे संकेत दिसून येत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना संसर्ग हळूहळू पाय पसरत आहे. दोन दिवसांतच तब्बल 38 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात शनिवारी जिल्ह्यात तब्बल 22 नवे बाधित आढळल्याने रुग्णसंख्येने शंभरी पार केली. काल जिल्ह्यात 104 सक्रिय रुग्ण होते. रविवारी शहरात 9 व ग्रामीणमध्ये 16 असे एकूण 25 नवे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या तब्बल 114 वर पोहोचली आहे. यातील 19 रुग्ण हे घाटीसह खासगी रुग्णालयांत दाखल असून 95 रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

Back to top button