औरंगाबाद : स्वस्तात आंबे न दिल्याने बाप-लेकांवर चाकू हल्ला | पुढारी

औरंगाबाद : स्वस्तात आंबे न दिल्याने बाप-लेकांवर चाकू हल्ला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : स्वस्तात आंबे न दिल्यामुळे वदळगाव येथील सहा जणांच्या टोळक्याने आंबे विक्रेत्या बापलेकावर चाकू, कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. यात बाप-लेक दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही गंभीर घटना कांचनवाडी येथील पैठण रोडवरील वाल्मी गेटसमोर 22 जूनच्या सायंकाळी पावणेसहा वाजता घडली. संजय मुळेकर आणि विकी संजय मुळेकर, अशी जखमींची नावे आहेत. विकीचा भाऊ रोहित मुळेकर (19, रा. दैवभारती हॉस्पिटलसमोर, कांचनवाडी) याने फिर्याद दिली. त्यानुसार, मुळेकर यांनी वाल्मीतील आंबे विकत घेतले आहेत. त्या आंब्यांच्या विक्री स्टॉल वाल्मी गेटसमोर पैठण रोडवर लावला आहे. 22 जून रोजी रोहित स्टॉलवर असताना आरोपी दिलीप डांगर हा आंबे खरेदीसाठी आला. त्याने 50 रुपये किलो दराने आंबे मागितले. रोहितने नकार दिला. डांगरने बघून घेतो, अशी धमकी दिली होती. त्यामुळे रोहित स्टॉलवरून निघून गेला.

Back to top button