वाशिम : अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरसह एका बोगस डॉक्टरला अटक | पुढारी

वाशिम : अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टरसह एका बोगस डॉक्टरला अटक

वाशिम : पुढारी वृत्तसेवा

वाशिम शहरातील रमेश टॉकीज परिसरात आरोग्य विभागाच्या पथकाने आणि शहर पोलिसांनी अवैध  गर्भपात करणाऱ्या एका रुग्णालयावर संयुक्त कारवाई केली. या कारवाईत डॉ. एस. एम. सारसकर आणि बोगस डॉक्टर  विलास ठाकरे या दाेघांना अटक करण्‍यात आली आहे.

शहरातील रमेश टॉकीज परिसरातील एस. एम. सारसकर नामक दवाखान्यात अवैध गर्भपात होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या टोल फ्री नबंरवर मिळाली.

या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग व पोलिसांनी छापा मारला. दवाखान्याची झडती घेतली.

त्यामध्ये गर्भपात करण्याचा औषधीचा साठा आणि अन्य साहित्य  मिळून आले.

 साहित्य जप्त करून आरोपी डॉ. सारसकर सह सहआरोपी विलास ठाकरे या बोगस डॉक्टरलाही अटक केली आहे.

दाेघांविरुद्ध विविध  कलमान्वये वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गर्भपात करण्यासाठी आलेल्या महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्यानं तिला त्रास वाढल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्‍सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : आईचे तुकडे करणारा कसा पोहचला फाशीच्या शिक्षेपर्यंत?

Back to top button