पैठण : फेसबुकवर पोस्ट करत एस.टी.बससमोर उडी मारून तरुणाची आत्महत्या | पुढारी

पैठण : फेसबुकवर पोस्ट करत एस.टी.बससमोर उडी मारून तरुणाची आत्महत्या

पैठण ; पुढारी वृत्तसेवा : व्यक्तिगत आयुष्याला कंटाळून पैठण तालुक्यातीलअमरापूर वाघूडी येथील एकाने आत्महत्या केली. अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुका युवक अध्यक्षाने एस.टी.बस समोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नेवासा-नगर महामार्गावरील कांगोणी फाटयाजवळ घडली. महेश कारभारी शिंदे असे आत्महत्या करणार्‍या तरूणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून तालुका युवक अध्यक्षपदावर हा युवक काम करत होता. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून महेश कुठल्यातरी कारणावरून तणावात होता.

त्याने नातेवाईक व मित्रमंडळींना याबाबत कसलीही कल्पना दिलेली नव्हती मंगळवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास त्याने आपल्या आयुष्यात खूप त्रास आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी पोस्ट फेसबुकवर टाकली. व त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील कांगोणी फाट्याजवळ दुचाकी बाजूला उभी करून जालनाकडे भरधाव धावणाऱ्या एस.टी.बस समोर अचानक उडी मारून आत्महत्या केली.

जखमी महेशला परिसरातील नागरिकांनी तात्काळ नेवासा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र महेश गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यावर त्याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. पैठण जवळील मूळगावी येथे महेशवर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोस्टनंतर अनेकांचे कॉल, कमेंटच्या माध्यमातून केली विनवणी

संध्याकाळी जेंव्हा महेशने फेसबुकवर आत्महत्या करीत असल्याची पोस्ट टाकली ती पोस्ट पाहून त्याच्या मित्र,जवळील नातेवाईक अशा अनेक लोकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र त्याने आत्महत्येपूर्वी मोबाईल बंद करून ठेवला होता. अनेकांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करून टोकाचे पाऊल उचलू नकोस अशी विनवणी केली.

मात्र त्यांनी आपली जीवन यात्रा अखिल संपवून टाकली या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महेशची अखेरची फेसबूक पोस्ट

आयुष्य खूप छान आहे पण त्याचे जवळचे लोक sobat असतिल तर माझही आयुष्य खूप सुंदर होत ..

पण मला कदाचित जगता आलं नाही मी माझ्या चुकीमुळे जगलो नाही…

मला जगता आल नाही…khup प्रेमाचे लोक भेटले..माझे मित्र तर एवढे ना की.कोणाचा जीव घेतील मी म्हणलो तर…पण असो…माझ्या आयुष्यात..खूप त्रास आहे…

जो मी konala sangu shakat nhi……pn mazi ek echha ahe mazya मृत्यु ला कोणालाही जबाबदार ठरवू नये…

मी मझ्या त्रासामुळे मरतोय… माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या मझ्या जिवलागांना खूप खूप धन्यवाद… thank u so much all

Back to top button