बीड : केज तालुक्यात सर्पदंशाने ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू | पुढारी

बीड : केज तालुक्यात सर्पदंशाने ऊसतोड मजुराच्या मुलीचा मृत्यू

बीड, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील सातेफळमध्ये एका ऊसतोड मजुराच्या महाविद्यालयीन मुलीचा विषारी सर्प दंशाने मृत्यू झाला. पायल रामेश्वर साळुंके असे, मत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.

या बाबतची माहिती अशी की, सातेफळ (ता. केज) येथील उसतोड मजूर रामेश्वर साळुंके यांची मुलगी पायल रामेश्वर साळुंके ही कळंब येथील महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत होती. पायलही (दि.९ जून) गुरुवार रोजी दुपारी ४:०० च्या दरम्यान घरी झोपलेली असताना तिच्या डाव्या पायाच्या बोटाला आणि टाचेच्या शिराजवळ विषारी सापाने चावा घेतला. तिला उपचारासाठी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. १०) तिचा मृत्यू झाला.

हेही वाचलतं का?

Back to top button