बीड : माजलगाव येथील तालखेडात वादातून केलेल्‍या गाेळीबारात एक जण गंभीर जखमी | पुढारी

बीड : माजलगाव येथील तालखेडात वादातून केलेल्‍या गाेळीबारात एक जण गंभीर जखमी

माजलगाव,पुढारी वृत्‍तसेवा : तालखेड येथे सायंकाळी सहाच्या दरम्यान कार गाडीला साईड न दिल्‍याने वाद झाला. या वादातून झालेल्या भांडणात अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेममुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून एका आरोपीला ताब्यात घेतले.

माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे ऊस तोडीसाठी गेलेले कामगार गावाकडे परत आले असता ते बस स्थानकावर आनंदोत्सव साजरा करत होते. यावेळी एक कार गाडी आली. ऊस तोड कामगारांनी कारला साईड न दिल्‍याने त्‍यांच्यात वाद झाले. या वादात कारमधील एका तरुणाने त्‍याच्याजवळील असलेल्या बंदुकीने गोळीबार केला.

यामध्ये सखाराम साहेबराव जाधव यांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर ग्रामस्थांनी आरोपीला ताब्यात घेऊन चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्‍यात दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button