बीड : पिकअप आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक ; सहाजण जखमी | पुढारी

बीड : पिकअप आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक ; सहाजण जखमी

बीड ; पुढारी वृत्तसेवा : 

मांजरसुंबा- पाटोदा दरम्यान लिंबागणेश परिसरात आज (दि.24) स सकाळी  पिकअप जीप व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघात सहाजण जखमी झाले असून, त्‍यांना  बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

लातूर जिल्ह्यातील मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावर लिंबागणेश येथील महावितरण कार्यालयासमोर  पिकअप जीप आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात महादेव जाधव (रा.लिंबागणेश) यांच्यासह पिकअपमधील बबन सोपान सुर्यवंशी (वय ५०), कुंडलिक गंगाराम सुर्यवंशी ( 60 ), कांशीराम सूर्यवंशी (५० ), चंद्रकांत विश्वंभर माने (३८) अनुसया अच्युत सूर्यवंशी, मंडुबाई केरबा गायकवाड (60 ), सिंधुबाई धमाजी माने (45  सर्व रा. उदगीर (जि. लातूर)  जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग व नेकनूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचलत का ?

Back to top button