औरंगाबाद हादरले : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा भोसकून खून | पुढारी

औरंगाबाद हादरले : एकतर्फी प्रेमातून तरुणीचा भोसकून खून

औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन तरुणीचा भरदिवसा भोसकून खून केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना आज (दि. २१) उघडकीस आली. देवगिरी महाविद्यालयाजवळ घडलेल्‍या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग ( वय १९) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती बीबीए प्रथम वर्गात शिकत होती. या घटनेच्या आधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ग्रंथी ही एका तरुणासाेबत रेस्‍टाॅरंटमध्‍ये गेली. येथे दाेघांचा वाद झाला. यानंतर तरुण तिला  ओढत नेत असल्याचे सीसीटीव्‍ही फुटेजमध्‍ये दिसत आहे.पाेलिस मारेकर्‍याचा शाेध घेत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button