जालना : २९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विजय घोगरे | पुढारी

जालना : २९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विजय घोगरे

जालना; पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित 29 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी इंजि.विजय घोगरे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी दिली.

मराठा सेवा संघाचे ते प्रदेशाध्यक्ष असून अनेक सामाजिक उपक्रमाव्दारे त्यांनी बहुमुल्य योगदान दिले आहे, या अगोदर डाॅ.डी.वाय.पाटील.डाॅ.पी.ए.इनामदार,उदय सामंत,आदी मान्यवरांनी स्वागताध्यक्ष पद भूषिवले आहे.

दिनांक 28 व 29 मे 2022 रोजी मंठा (जालना) येथे सुप्रसिद्ध साहित्यिक डाॅ.श्रीपाल सबनीस यांच्या संमेलनाध्यक्षतेखाली 29 वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनास देशभरातून चारशे साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.

ग्रंथदिंडी, परिसंवाद, चर्चासत्र,कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहे. या साहित्य संमेलना निमित्ताने स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार आहे. या अगोदर सांगली, औरंगाबाद, उदगीर, पुणे, तुळजापूर, सोलापूर नवी मुंबई, गोंदिया, जव्हार, वणी रत्नागिरी आदी ठिकाणी संमेलनं संपन्न झाली आहेत.

साहित्य संमेलनाच्या नियोजन संदर्भात जालना येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अनिल खंदारे, औरंगाबाद विभागीय अध्यक्ष भरत मानकर, प्रदेश संघटक अमोल कुंभार, जिल्हा कुलदीप रूघे, जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, सुकाणू समिती सदस्य प्रा.धोंडोपंत मानवतकर, प्रा.सदाशिव कमळकर, प्रा.प्रदीप देशमुख, प्रा.कु.पी.इंगळे, गौतम वाहूळ, अशोक तनपूरे, योगेश बरिदे, डाॅ. बप्पासाहेब म्हस्के, अरविंद देशमुख, प्रा.प्रशांत येलगड, प्रा. भारत खंदारे आदीजण उपस्थित होते.

Back to top button