बीड : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे चार वाहनांचा अपघात; दोघे ठार | पुढारी

बीड : रस्त्याच्या अर्धवट कामामुळे चार वाहनांचा अपघात; दोघे ठार

केज ; पुढारी वृत्‍तसेवा : केज ते धारूरकडे जाणाऱ्या रस्त्‍यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ट्रकची समोरासमोर धडक झाली. यामध्ये रस्त्याने जाणाऱ्या मोटर सायकलवर ऊस पडून दोघे युवक जागीच ठार झाले. तर ट्रॅक्टर ट्रॉली मधील ऊस रस्त्याने जात असलेल्या कार गाडी (क्र. एम एच १२/क्यू एस ९६९६) वर पडल्याने गाडीचे नुकसान झाले आहे. मात्र जिवीतहानी झाली नाही.

या बाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी ४ च्या सुमारास केज शहरातील धारूर अंबाजोगाई रस्त्यावरील भवानी चौकात एक उसाने भरलेला ट्रक (क्र. एमएच-८/ एच ३०८) धारूकडून येत असताना त्या ट्रकने उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला (क्र.एम एच-४४/डी-१११३) समोरून धडक दिली.

या अपघातात ट्रक पलटी झाला आणि त्यातील ऊस रस्त्याने जाणाऱ्या बुलेट (क्र. एम एच १७/बी ए ३१३)  जात असलेले जुबेर असेफ शेख (वय, ३०) आणि शोएब नासेर कुरेशी (वय २५, रा. केज) यांच्या अंगावर पडला. त्यांच्या अंगावर ट्रकमधील ऊस पडल्याने उसाखाली दबल्याने ते जागीच ठार झाले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी क्रेन आणि जेसीबीने साहय्याने दोन्ही वाहने बाजूला करून मृतदेह बाहेर काढले. या अपघातामुळे बीड अंबाजोगाई, कळंब व धारूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने रस्त्याच्या चारही बाजूस वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. सायंकाळी सात वाजेपर्यंत वाहतूक जॅम झाली होती.

संतप्त नातेवाईकांनी मृतदेह तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात आणले

अपघातातील दोन्ही प्रेत बाहेर काढल्या मयताच्या नातेईकांनी हा अपघात एचपीएम कंपनीच्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे झाला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यासाठी दोन्ही मृतदेह अगोदर तहसील कार्यालय आणि नंतर केज पोलीस ठाण्याच्या आवारात आणून ठेवले हाते.

Back to top button