वाशिम : वागणूक नीट न दिल्याच्या रागातून लेकानेच केली बापाची हत्या | पुढारी

वाशिम : वागणूक नीट न दिल्याच्या रागातून लेकानेच केली बापाची हत्या

वाशिम, पुढारी वृत्तसेवा : वाशिम येथे केकतऊमरा येथे दि. ६ मे रोजी रात्री तामसाळा शेतशिवारात असणाऱ्या दुर्गामाता संस्थान, मंदिरात नेहमीप्रमाणे झोपलेले पुजारी मारोती भिकाजी पुंड (वय-५२, रा. केकतऊमरा) यांची अज्ञात व्यक्तीने मंदिराच्या मागील बाजूने प्रवेश करत हत्या केली. परंतु, पोलिसांच्या तपासांती मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

याविषयीची फिर्याद मृत पुजारीच्या पत्नी पुंजाबाई मारोती पुंड यांनी वाशिम ग्रामीणच्या पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात मृत व्यक्तीचा मुलगा गणेश मारोती पुंड यांची चौकशी केली असता, त्यानंतर वडिलांची हत्या केल्याचे कबूल केले.

चौकशीत समोर आले की, वडील आपल्या मुलाला नेहमीच वाईट वागणूक देत होते. त्यामुळे दोघांच्यात सतत वाद होत होते. रागाच्या भरात गणेश मारोती पुंड (वय-३०) यांनी मंदिरात जाऊन वडिलांचा खून केला. संबंधित मुलास पोलिसांनी अटक केलेली आहे. अधिक तपास हे पोलीस अधिकारी संजय मच्छले आणि त्यांचे सहकारी करत आहेत.

हेही वाचा  

Back to top button