मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण दिशाभूल करतायत : विनायक मेटे - पुढारी

मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण दिशाभूल करतायत : विनायक मेटे

वाशिम; पुढारी वृतसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी अशोक चव्हाण हे कोणतेही प्रयत्न करत नसून ते फक्त दिशाभूल करत आहेत, अशी टीका आमदार विनायक मेंटे यांनी केली. येथे आयाेजित  (दि. ५)  पत्रकार परिषदेत विनायक मेटे बोलत होते.

राज्य सरकारची मराठयांना आरक्षण देण्याची कोणतीही मानसिकता दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळून देण्यासाठी अशोक चव्हाण कोणतेही प्रयत्न करत नाहीत. फक्त ते नागरिकांची दिशाभूल करत असून अशोक चव्हाण यांना आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे यांनी लवकरच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्‍यांनी केली.

केंद्राने मराठा आरक्षणाची टक्केवारी वाढवावी अशी  मागणी अशोक चव्हाण नेहमी करतात. मात्र, मागासवर्गीय अयोग्य नेमल्याशिवाय आरक्षण मिळू शकणार नाही. मागासवर्गीय आयोगामार्फत जावं लावेल. यानंतरच मराठा आरक्षणाबाबत मार्ग निघेल, असेही या वेळी  विनायक मेटे यांनी सांगितले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवा मते हवी आहेत. पण ते आरक्षणावर बोलत नाहीत. इतके आमदार, मंत्री असूनही कोणीच मुस्लिमांच्या आरक्षणावर बोलत नाही. कारण त्यांना शिवसेनेची भीती आहे. सरकारच्या बाहेर पडावे लागेल याची त्यांना भीती वाटते. त्यामुळे समाज हितापेक्षा यांना सत्ता महत्वाची आहे, असा आरोपदेखील विनायक मेटे यांनी केला.

हेही वाचलंत का? 

पाहा : मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर

Back to top button