बनावट लग्नातील मामा पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

बनावट लग्नातील मामा पोलिसांच्या ताब्यात

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : तळणेवाडी या ठिकाणच्या एका युवकांला बनावट लग्न करून त्याची फसवणुक केल्या प्रकरणी गेवराई पोलिसांत गुन्हा दाखल होता. यातील मुख्य सुत्रधाराला शेवगांव येथून गेवराई पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली होती. तसेच बुधवारी रात्री या प्रकरणातील नवरी मुलीचा बनावट मामा याला औंरगाबाद या ठिकाणा वरून  पोलिसांनी अटक केली आहे.

विठ्ठल किसनराव पवार (वय ३५) राहनार औंरगाबाद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील बनावट लग्न लाऊन दोन लाखांला गंडा घातल्या प्रकरणात नव वधू , तिचे नातेवाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणात नवरी मुलीचा मामा म्हणून मिरवणा-या मामाला आता अटक करण्यात आली आहे याने यापुर्वी देखील असे अनेकांना फसवले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असुन वरील आरोपीला गुरुवार रोजी गेवराई न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस साजेद सिद्धिकी यांनी दिली.तसेच सदरची आरोपीला अटकेची कारवाईत पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड,पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार,सहा पोलिस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी, नवनाथ गोरे,विठ्ठल देशमुख यांनी केली.

Back to top button