बीड : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार | पुढारी

बीड : अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : गेवराई येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील गढी येथे रस्ता ओलांडणा-या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत  जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवार (दि.16) रात्री 7 च्या सुमारास घडली. हा बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्‍थळी पोहचले.

गढी जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरिल उतारावरील एका पेट्रोल पंपासमोर शनिवार रात्री 7 च्या सुमारास एक बिबट्या रस्ता ओलांडत होता. दरम्‍यान वाहनांच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची बातमी सोशल मीडियावर पसरताच बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्गावर तोबा गर्दी केली होती. या गर्दीमुळे दंगल नियंत्रण पथकाला पाचरण करण्यात आले व दंगल नियंत्रण पथकाने अनेक नागरिकांना काठ्याचा मार देखील दिला.

हेही वाचा  

Back to top button