माजलगाव : नित्रुड येथे बोगस डॉक्टरवर शोध पथकाने केली कारवाई | पुढारी

माजलगाव : नित्रुड येथे बोगस डॉक्टरवर शोध पथकाने केली कारवाई

माजलगाव, पुढारी वृत्‍तसेवा : माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्‍टारास माजलगावच्या तहसीलदार वर्षा मनाळे, सह.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे, आरोग्य सहाय्यक प्रशांत जगनाडे, दिंद्रुड पोलिसांनी रंगेहात पकडले.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नित्रुड येथे माजलगाव तेलगाव महामार्गावर जनसेवा आयुर्वेदिक उपचार या नावाने सुभाष राठोड हा डॉक्‍टर अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करत होता. जिल्हा आरोग्य अधिकारी बीड आणि माजलगाव तहसीलदार वर्षा मनाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मधुकर घुबडे यांनी रुग्णालयावर छापा टाकला. यावेळी सुभाष राठोड हा रुग्णांना तपासत असताना रंगेहात पकडले.

सदर इसमास खाजगी वैद्यकीय व्यवसाय करत असल्याबाबतची माहिती मागितली असता, अधिकृत कुठलेही कागदपत्रे आढळली नाहीत. अनधिकृत वैद्यकीय कागदपत्रांसह आयुर्वेदिक औषधी गोळ्या तसेच तपासणी करताना समोर आल्‍याने दिंद्रुड पोलिसात फिर्यादी डॉ. अमोल मायकर यांच्या फिर्यादीवरून सुभाष बाबुराव राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हे ही वाचा  

Back to top button