वैद्यनाथ अर्बन को. ऑप. बॅँकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा - पुढारी

वैद्यनाथ अर्बन को. ऑप. बॅँकेचे चेअरमन अशोक जैन यांचा राजीनामा

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा: भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे याच्या अध्यक्षतेखालील व मराठवाड्यात बॅंकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या वैद्यनाथ अर्बन को. ऑप. बॅँकेचे चेअरमन अशोक जैन यांनी राजीनामा दिला आहे. वैद्यनाथ अर्बन को. ऑप. बॅँकेचे चेअरमन अशोक जैन हे गेल्या १० वर्षांपासून अध्यक्ष राहिलेले आहेत.

या बँकेच्या येत्या काही महिन्यांत संचालक मंडळाच्या निवडणुका होणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देण्यात आल्याने अनेक राजकीय तर्क -वितर्क लढविले जात आहेत. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडे चेअरमनपदी कोणाला संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा 

वैयक्तिक कारणाने दिला राजीनामा 

संपूर्ण राज्यात शाखा असलेल्या वैद्यनाथ अर्बन को ऑप. बँकेचे अध्यक्ष अशोक जैन यांनी गुरुवारी (दि.२९) सायंकाळी झालेल्या बोर्ड कमिटीच्या बैठकीत आपल्या पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा आपण वैयक्तिक कारणांमुळे देत असल्याचे त्यांनी राजीनामा देताना सांगितले.

अधिक वाचा 

संपूर्ण महाराष्ट्रात अग्रगण्य असलेली व १००० कोटींच्या ठेवी असलेल्या वैद्यनाथ बँकेचे गेल्या १० वर्षांपासून अशोक जैन हे अध्यक्ष राहिलेले आहेत. १३ जुलै २०११ ला अशोक जैन यांनी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर २५० कोटींच्या ठेवीवरुन १००० कोटींच्या ठेवी, मराठवाड्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या शाखा स्थापन करुन विस्तार झाला आहे.

अशोक जैन यांच्यावर गेल्या काही वर्षांपासून गैरव्यवहाराचे आरोप होऊ लागले. पण, या सर्व आरोपांना अशोक जैन यांनी बँकेच्या प्रगतीतून या आरोपांना उत्तर दिले आहे. पण गुरुवारी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे कारण देत अशोक जैन यांनी राजीनामा दिला.

अधिक वाचा 

या बँकेचे अध्यक्ष म्हणून पंकजा मुंडे आता कोणाची नेमणूक करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काही महिन्यात बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूका होणार आहेत. यादृष्टीने नवीन चेअरमनपदी कोणाची वर्णी लागणार? याला विशेष महत्त्व आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button