Parbhani : कौटुंबिक वादातून सेवानिवृत्त लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

Parbhani : कौटुंबिक वादातून सेवानिवृत्त लाईनमनची गळफास घेऊन आत्महत्या

पाथरी, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून एका सेवानिवृत्त लाईनमनने विजेच्या खांबाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना शनिवार (दि. २६ मार्च) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. दुर्योधन गवई असे आत्महत्या केलेल्या सेवानिवृत्त लाईनमनचे नाव आहे. कौटुंबिक वादातून दोन दिवसांपूर्वी दुर्योधन गवई यांनी पत्नीला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. (Parbhani)

शुक्रवारी २५ मार्च रोजी रात्री घरासमोरील विजेच्या खांबाला गळफास लावून गवईने आत्महत्या केली. हा प्रकार शनिवार २६ मार्च रोजी पहाटे उघडकीस आला. घटनेची माहिती पाथरी पोलीसांना देण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलीसांच्या पथकाने पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाथरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. पुढील तपास पाथरी पोलीस करत आहेत. (Parbhani)

हेही वाचलतं का?

 

Back to top button