पुरग्रस्‍तांना मदत : परळीत पंकजा मुंडे उतरल्या रस्त्यावर - पुढारी

पुरग्रस्‍तांना मदत : परळीत पंकजा मुंडे उतरल्या रस्त्यावर

बीड; पुढारी वृत्तसेवा:  पुरग्रस्‍तांना मदत करण्‍यासाठी  भाजप नेत्या पंकजा मुंडे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. पुरग्रस्‍तांना मदत करण्‍यासाठी त्‍यांनी परळीत गुरुवारी (दि. २९) फेरी काढली. कोकणात महापुरामुळे हाहाकार माजला आहे. सरकार मदत करत असले तरी सर्वस्तरांतून मदतीसाठी लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.

सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येक अडचणीत पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान मदतीसाठी धावून येत असतात. राज्यातील काही जिल्‍ह्यांमध्‍ये सध्या पुराने थैमान घातले आहे. पंकजा मुंडे या दरम्यान पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.

अधिक वाचा 

मदत फेरी दरम्यान पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही प्रत्येक संकटात मुंडे प्रतिष्ठानतर्फे मदत करत असतो. वाढदिवस हा नेत्याचा सोहळा असतो; पण व्यक्तीचा सोहळा लोकनेते मुंडे साहेबांना मान्य नव्हता. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना विनंती केली होती माझ्या वाढदिवसाला सोहळा नको. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सूचवलं मदत फेरी करुन पूरग्रस्तांना मदत करुयात.

अधिक वाचा 

थेट मदत ठरेल फायद्याची

मी परळीची कार्यकर्ती असल्यामुळे येथे रॅली काढून पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करत आहे. पूरग्रस्त भागात जावून भेट देण्याऐवजी थेट तिथे मदत पोहोचली तर ते फायद्याचं आहे. पुरग्रस्तांना मदत मिळावी हा हेतू आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

यापुढे परिस्थिती खूप कठीण आणि बिकट आहे. काही गावं मुख्य प्रवाहातून तुटली आहेत. त्यांना उभं करावं लागेल. अशा परिस्थितीत त्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. मी सध्या तरी त्याठिकाणी जाणार नाही. माझ्या जाण्याने गर्दी होऊन यंत्रणांवर ताण नको. त्यापेक्षा माझी मदत तिकडे पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा 

संकटाशी समर्पण महत्वाचे

सोशल मीडियावर ‘पंकजा मुंडेंचं शिवसेनेत स्वागत’ अशा पोस्ट फिरत आहेत. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या, आता हा विषय नाही. सध्या खूप गंभीर परिस्थिती आहे. शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस असं काही नाही. महाराष्ट्रावर आलेलं संकट मोठं आहे. या संकटासाठी समर्पण महत्त्वाचं आहे. असे त्या म्हणाल्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button