बीड : पोलीस मुख्यालयावर मंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

बीड : पोलीस मुख्यालयावर मंत्री धनंजय मुंडेंसमोरच एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

बीड : पुढारी वृत्‍तसेवा : बोगस रस्त्याविषयी कारवाई होत नसल्याने, एकाने पोलीस मुख्यालयावर झेंडावंदनस्थळी मंत्री धनंजय मुंडेंसमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी झेंड्याच्या समोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विनोद शेळके असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

तसेच, बीड शहरातील पंचशील नगर रस्त्याचं बोगस काम झाल्याची तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्यामुळं आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलाय. तर मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर अन झेंडावंदन स्थळी आत्मदहनाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली असून मंत्री धनंजय मुंडेंनी याची दखल घेतलीय. ते म्हणाले, की कोणताही रस्ता एका व्यक्तीसाठी नसतो, त्यांनी चौकशीचं पत्र दिलं असतं तरी चौकशी केली असती. त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Back to top button