सुरेश शिपुरकर, शैलजा साळोखे यांना ‘ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव’ पुरस्कार

डॉ. यशवंत थोरात यांच्या हस्ते शनिवारी होणार वितरण
suresh-shipurkar-shailaja-salokhe-win-brand-kolhapur-lifetime-achievement-award
सुरेश शिपुरकर, शैलजा साळोखे यांना ‘ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव’ पुरस्कार
Published on
Updated on

कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ टेबल टेनिस खेळाडू शैलजा साळोखे यांना यंदाचा ‘ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. 18) नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्रांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी वरिष्ठ पातळीवर काम केलेले कोल्हापूर जिल्ह्यातील आजी-माजी अधिकार्‍यांना निमंत्रित केले जाते. यावर्षी पॅरिस ऑलिम्पिक ब—ॉन्झ पदक विजेता स्वप्निल कुसाळे, बिरदेव डोणे यांच्यासह यूपीएससी परीक्षेतील यशस्वी, दक्षिण आफ्रिकेतील कॉम—ेडस् अल्ट्रा मॅरेथॉनमधील यशस्वी धावपटू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान होणार आहे. ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य अजेय दळवी, चेतन चव्हाण, अनंत खासबारदार, भरत दैनी, डॉ. अमर आडके, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news