

कोल्हापूर : कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रीडानगरी असा नावलौकिक असणार्या कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत तब्बल सात शिवछत्रपती पुरस्कार पटकावले आहेत. शुक्रवारी (दि. 18) बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
कोल्हापूरला सन 2023-24 च्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या यादीत एक क्रीडा मार्गदर्शकासह सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये दिव्यांग खेळाचे क्रीडा मार्गदर्शक मानसिंग यशवंत पाटील (पॅरा जलतरण), रग्बी खेळातील कल्याणी पाटील व पृथ्वीराज पाटील, अॅथलेटिक्स खेळातील किरण भोसले, कुस्तीपटू श्रृष्टी भोसले, वेटलिफ्टिंगमधील अभिषेक निपाणी आणि सॉफ्टबॉल स्पर्धेतील ऐश्वर्या पुरी यांचा समावेश आहे.