

राधानगरी : घोरपडे कारखाना अफरातफरप्रकरणी सुरू असलेला खटला रद्द करण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने निकालात काढली आहे. केस रद्द केलेली नसल्याने या विषयावर त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही, असे सांगत या कारखान्याच्या 40 हजार सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील, असे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले.
कारखाना अफरातफरप्रकरणी उच्च न्यायालयाने मुश्रीफ यांची याचिका निकालात काढली. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या. याविषयी पत्रकारांनी त्यांना विचारले असता राधानगरी येथे घाटगे यांनी आपले मत व्यक्त केले.
घाटगे म्हणाले, संताजी घोरपडे साखर कारखान्यातील अफरातफर प्रकरणासंदर्भातील हा खटला कुठेही जाऊ देणार नाही. याबाबतचा प्रॉपर युक्तिवाद करून चाळीस हजार सभासदांना न्याय देण्यासाठी आमचा लढा चालू राहील.