कोल्हापूर : मांसाहार आणि कोल्हापूरकरांचे नाते जगप्रसिद्ध आहे. तांबडा, पांढरा रस्सा, सुके मटण आणि बिर्याणीवर आठवड्याच्या बुधवारी आणि रविवारी तडाखाच दिला जातो. रविवारी दीप अमावास्येला म्हणजेच गटारीला कोल्हापूरकरांनी 3 टन चिकन, 2 टन मटण आणि एक टनाहून अधिक माशांवर चांगलाच ताव मारला. तसेच अमावस्येनिमित्त 2 हजार गावठी कोंबड्यांची विक्री झाली.
मटण, चिकन विक्री दुकानांसमोर सकाळपासूनच गर्दी
सोमवारपासून (दि. 5 ऑगस्ट ) श्रावण मास सुरू होत आहे. रविवारी आलेल्या दीप अमावास्येला गटारी असेही संबोधले जाते. श्रावण मासामध्ये बहूतांशी कुटुंबात मासांहार केला जात नाही. अशावेळी रविवारीच अमावास्याही आल्याने कोल्हापुरात खवय्यांनी मासांहारावर भर दिला. शहरासह उपनगरातील मटण, चिकन विक्री दुकानांसमोर सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. कांही मटन, चिकण दुकानांच्या समोर खरेदीसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागून होत्या. सध्या गोड्या पाण्यातील मासे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातून येणार्या रस्त्यांच्याकडेला मासे विक्री सुरू होती.
अनेकांनी घरी मांसाहारी जेवणाचा बेत
शहरातील मुख्य मटन मार्केट आणि त्याच्या परिसरात खेकडे, चिंगळ्या खरेदीसाठी सकाळपासून गर्दी होती. मटनाचा दर 680 रुपये किलो तर चिकण 160, 180 ते 210 रुपये किलो असा दर होता. फुलेवाडी, आंबेवाडी, रिंगरोड, कळंबा, सुभाषनगर रोड या परिसरात थेट कोकणातून येणार्या समुद्री माशांच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली. या अमावास्येनिमित्त ग्रामीण भागात देवाला कोंबडी देण्याची प्रथा आहे. गावठी कोंबडी खरेदी करण्यासाठी रविवारी शहरातील लुगडी ओळीतील माळकर तिकटी ते मुख्य मटन मार्केट या रस्त्यावर गावरान कोंबडा-कोंबडी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर व्यापारी आले होते. यामुळे हा रस्ता खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे फुलून गेला होता. अमावास्या त्यातच रविवारी सुट्टी ही पर्यवणी साधत अनेकांनी घरी मांसाहारी जेवणाचा बेत न करता सहकुटुंब हॉटेलमध्ये जाऊन गटारी साजरी केली. यामुळे शहरातील हॉटेल्स फुलून गेली होती