कळे : पुढारी वृत्तसेवा : समाज मनावर माध्यमांचा मोठा प्रभाव पडत असून माध्यमांनी आत्तापर्यंत विश्वासार्हता टिकविण्याचे काम केले आहे. लोकल गोष्टीला ग्लोबल करण्याचे काम शिक्षणामुळे शक्य असून पुढारी टॅलेन्ट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जीवनातच झाली, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ग्रामीण साहित्यिक प्रा. कृष्णात खोत यांनी केले. (Pudhari Talent Search Exam)
कळे येथील कुमार-कन्या विद्यामंदिर शाळेमध्ये पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेतील पश्र्चिम पन्हाळा परिसर व गगनबावडा तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील होते. शिक्षण विस्तार अधिकारी आर. टी. बरगे व केंद्रप्रमुख विजय फासे आदी उपस्थित होते. (Pudhari Talent Search Exam)
प्रास्ताविकामध्ये रवींद्र पाटील यांनी 'दैनिक पुढारी'च्या सामाजिक कार्याचा आढावा घेवून पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा आयोजन करण्याचा उद्देश सांगितला. यावेळी विस्तार अधिकारी आर. टी. बरगे यांनी पुढारी टॅलेन्ट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडल्याचे सांगितले. प्राथमिक शिक्षक चंद्रकांत पंडीत यांनी ऑनलाईन शिक्षणाची गरज व कृष्णा गुरव यांनी कृतियुक्त शिक्षणाची गरज याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय मनोगतामध्ये जि. प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी देशाच्या संरक्षणा इतकेच पैसे प्राथमिक शिक्षणावर खर्च करण्याची गरज असल्याचे सांगून पुढारी टॅलेंट सर्च परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम झाला असल्याचे सांगितले. (Pudhari Talent Search Exam)
याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी आर टी बरगे, केंद्रप्रमुख विजय फासे,कळे विद्यामंदिरचे प्राचार्य ए.बी.गायकवाड, वितरण प्रतिनिधी शशांक पाटील, रवींद्र पाटील, विश्वास चौगले, संभाजी पाटील यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. विजय फासे यांनी सूत्रसंचालन केले. संभाजी पाटील यांनी आभार मानले.