Private Bus Ticket Price Hike | ऐन दिवाळीत झटका! खासगी आरामबसचे तिकीट दर जवळपास दुप्पट

कोल्हापूर-मुंबई मार्गावर आसन आरक्षण एक ते दीड हजार रुपयांपर्यंत
Private Bus Ticket Price Hike
Private Bus Ticket Price Hike | ऐन दिवाळीत झटका! खासगी आरामबसचे तिकीट दर जवळपास दुप्पट
Published on
Updated on

कोल्हापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी आरामबस चालकांनी तिकीट दरांमध्ये जवळपास दुपटीने वाढ केल्याने प्रवाशांवर आर्थिक भुर्दंड पडला आहे. ऑफ सिझनमध्ये कोल्हापूर-मुंबई मार्गावर 500 ते 700 रुपयांत मिळणारी आसन आरक्षणे सध्या एक ते दीड हजार रुपयांपर्यंत गेली आहेत. मुंबईहून कोल्हापूरकडे परतताना काही बसचे दर तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. दरवाढीमुळे सोशल मीडियावरूनही नाराजी व्यक्त केली जात आहे.

जिल्ह्यात सुमारे 550 खासगी आराम बसेस नियमित धावत असून, त्यापैकी जवळपास निम्म्या पुणे-मुंबई मार्गावर धावत असतात. याशिवाय रोज नाशिक, औरंगाबाद, बंगळूर, नांदेड, नागपूर, अहमदाबाद, हैदराबाद मार्गावर बसेस धावत असतात. सध्या दिवाळी आली की, शाळांनाही सुट्ट्या पडतात. त्यामुळे चाकरमान्यांना गावाकडची ओढ लागते. त्यामुळे या काळात प्रवशांची गर्दी वाढत असते. याचा फायदा घेऊन खासगी आराम बसचालकांनी तिकिटांचे दर वाढवले आहेत. परिणामी दिवाळीसाठी गावी जाणार्‍या प्रवाशांना मोठा खर्च करावा लागत आहे.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) काही दिवसांपूर्वीच जादा भाडे घेणार्‍या बसचालकांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीदेखील प्रत्यक्षात कोणतीही कारवाई न झाल्याने खासगी बस चालकांचा दर वाढवण्याचा सिलसिला कायम असल्याची टीका होत आहे.

असे आहेत सध्याचे दर...

मुंबईला ऑफ सिझनला 500 ते 700 रुपये तिकीट असते. आता 1000 ते 1200 रुपये सुरू आहे. पुण्याला 300 ते 500 रुपये नियमित असणारे तिकीट आता 500 ते 800 रुपये झाले आहे. अन्य मार्गावरील तिकिटांचे दरही वाढविले आहेत. साधारणपणे दुपटीने तिकिटाच्या दरात वाढ झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news