आवाडे पिता-पुत्रांचा भाजपमध्ये प्रवेश

केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
Prakash Awade joins BJP
आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
Published on
Updated on

कोल्हापूर ः आमदार प्रकाश आवाडे व त्यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. शहा यांनी पुष्पगुच्छ व पक्षाचा गमछा देऊन आवाडे पिता-पुत्रांचे स्वागत केले. विशेष म्हणजे, गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी माजी आमदार सुरेश हाळवणकर हेच आवाडे पिता-पुत्रांना घेऊन व्यासपीठावर गेले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची राजकीय घडामोड घडल्याने राजकीय समीकरणे पुन्हा बदलणार आहेत.

बुधवारी झालेल्या मेळाव्यातील ही एक महत्त्वाची घडामोड असून, केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री सुरेश खाडे, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह भाजपचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. आवाडे पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे इचलकंरजी मतदारसंघातील चित्र तर स्पष्ट झालेच आहे; पण बाजूच्या दोन ते तीन विधानसभा मतदारसंघांत आवाडे फॅक्टरचा परिणाम होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news