कोल्हापूर :बांधकाम कामगाराच्या पोट अन् गळ्यातून आरपार घुसल्या सळ्या

परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू
migrant youth died on the spot
बांधकाम कामगाराच्या पोट अन् गळ्यातून आरपार घुसल्या सळ्याPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गवंडी काम करताना पाय घसरून पडलेल्या परप्रांतीय कामगाराच्या पोटातून आणि गळ्यातून घुसून सळ्या आरपार गेल्या. दोन सळ्या शरीरातून आरपार गेल्याने संबंधित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आनंद कपूरचंद मिश्रा (वय 27, सध्या रा. हरिओमनगर, मूळ रा. आरमन, जौनपूर, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. फुलेवाडी रिंग रोडवरील कोतवालनगर येथे मंगळवारी दुपारी 4.30 च्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली.

ठेकेदार अशोक लक्ष्मीप्रसाद राठोड याच्याकडे मिश्रा याच्यासह काही परप्रांतीय कामगार कामासाठी आहेत. कोतवालनगरातील एका इमारतीचे बांधकाम त्या ठेकेदाराने घेतले आहे. त्या ठिकाणी मिश्रा याच्याबरोबर आणखी एक कामगार दुपारी काम करत होता. बांधकामाचे साहित्य आणताना वरच्या मजल्यावरून पाय घसरून मिश्रा खाली पडला. खालच्या मजल्यावरील लोखंडी सळ्यांवरच तो कोसळला. या घटनेत मिश्राच्या पोटात आणि गळ्यात सळ्या घुसल्या. आरपार सळ्या घुसल्याने मिश्रा रक्तबंबाळ झाला. मिश्रासोबत असलेल्या इतर कामगारांनी आरडाओरडा केल्याने इतरांना घटनेची माहिती समजली.

त्यानंतर इतर कामगारांसह नागरिक जमा झाले. मिश्राच्या सहकार्‍यांनी जागेवरच त्याच्या पोटात घुसलेली सळी बाहेर काढली. गळ्यात घुसलेली सळी कापून काढली. नागरिकांनी तत्काळ 108 अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला. अ‍ॅम्ब्युलन्समधून मिश्राला उपचारांसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले; परंतु येथे उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मिश्राच्या सहकार्‍यांनी ठेकेदाराला घटनेची माहिती दिली. त्यानंतर मिश्राच्या सहकारी कामगारांनी त्याच्या गावी मोबाईलवरून संपर्क साधला. रात्री उशिरापर्यंत सीपीआरमध्ये परप्रांतीय कामगार थांबून होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news