Kolhapur Crime: लोहगडची पुनरावृत्ती! लग्न ठरल्याने प्रेमसंबंधास नकार, प्रेयसीची खोल दरीत ढकलून हत्या

Naikwadi Kolhapur: नाईकवाडीतील घटनेने खळबळ; संशयित प्रियकर पोलिसांच्या ताब्यात, साडेपाच वर्षांपासून होते प्रेमसंबंध तरन्नूम बेपत्ता झाल्याचा बनाव, अपहरणाचा होता गुन्हा दाखल
 Bhudargad Lover Pushes Girlfriend Valley
गारगोटी : दरीत पडलेला मृतदेह बाहेर काढताना बचाव पथकाचे कर्मचारी व पोलिस.Pudhari photo
Published on: 
Updated on: 

Kolhapur Crime woman killed pushed into valley

गारगोटी (कोल्हापूर) : लग्न ठरल्याने प्रेमसंबंध पुढे सुरू ठेवण्यास नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीला अडीचशे फूट खोल दरीत ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार भुदरगड तालुक्यातील नाईकवाडी येथे उघडकीस आला. तरन्नूम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. गारगोटी) असे मृत प्रेयसीचे नाव आहे. याप्रकरणी श्रीपाद दिनकर वडर (२५, रा. अवधूत कॉलनी, गारगोटी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शनिवारी पोलिस व आंबोली येथील बचाव पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दरीतून प्रेयसीचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने गारगोटीसह भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

एकमेकांच्या घरासमोर राहणाऱ्या तरन्नूम आणि श्रीपाद यांच्यात साडेपाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरन्तूम अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. चार महिन्यांपूर्वी तिचा विवाह ठरल्याने ती श्रीपादला भेटणे टाळत होती. शुक्रवारी (दि. ९) सकाळी अकराच्या सुमारास श्रीपाद तिला गोड बोलून नाईकवाडी येथील कड्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला. तेथे तरन्नूमने लग्न ठरल्याचे सांगत यापुढे प्रेमसंबंध ठेवता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावरून संतप्त झालेल्या श्रीपादने दुपारी तीनच्या सुमारास तिला खोल दरीत ढकलले.

 Bhudargad Lover Pushes Girlfriend Valley
Kolhapur Accident | मुरगूड-निढोरीदरम्यान भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडले; अडकूरचा दुचाकीस्वार जागीच ठार

घटनेनंतर श्रीपाद स्वतःहून भुदरगड पोलिस ठाण्यात हजर झाला. पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गेलो असता तरन्नूम बेपत्ता झाल्याचा बनाव त्याने केल्याची माहिती आहे. सुरुवातीला पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र, चौकशीदरम्यान संशय निर्माण झाला. पुढील तपासात त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतदेह विच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर

शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास पोलिस घटनास्थळी पोहोचले; मात्र अंधारामुळे शोधमोहीम थांबवावी लागली. शनिवारी सकाळी आंबोली येथील बचाव पथकाच्या मदतीने पुन्हा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक संदीप जगताप, उपनिरीक्षक अलीम मुल्ला, हेड कॉन्स्टेबल अमीर नदाफ, स्वप्निल मोरे, तानाजी डवरी, विकास कांबळे आणि शीतल पाडेकर यांच्यासह बचाव पथकाने सुमारे चार तास शोधमोहीम राबवली. रोपच्या साहाय्याने अडीचशे फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

 Bhudargad Lover Pushes Girlfriend Valley
Kaustubh Gawade| गारगोटी परिसरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात

लोहगडावरील घटनेची आठवण

प्रेयसीचा विवाह ठरल्याने ती दुसऱ्याची होणार, या रागातून प्रियकराने तिला दरीत ढकलले. या घटनेत एका निष्पाप तरुणीचा हकनाक बळी गेल्याने भुदरगड संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. या घटनेमुळे पुणे येथील लोहगडावरील घटनेची चर्चा परिसरात सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.