Maharashtra E Bus | कोल्हापूरला मिळणार १०० इलेक्ट्रिक बसेस

इंधनाची बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
Maharashtra E Bus
Maharashtra E Busonline Pudhari
Published on
Updated on

कोल्हापूर : आशिष शिंदे

कोल्हापूरला विजेवर चालणाऱ्या १०० बसेस लवकरच मिळणार आहेत. त्याची पूर्व तयारी म्हणून ताराबाई पार्क येथे चाचिंग स्टेशन उभारले जाणार आहे. राज्य सरकारने त्यासाठी ९ कोटी ८६ लाख ९६ हजार ६३७ रुपये मंजूर केले आहेत.

Maharashtra E Bus
कोरेगावमधील मुख्य रस्त्यांची चाळण

येत्या तीन महिन्यांत हे चार्जिंग स्टेशन पूर्ण होणार असून त्यानंतर विजेवर चालणाऱ्या बससेवा वाढणार आहेत. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होणार असून डिझेलच्या खर्चातही बचत होणार आहे. इंधनाची बचत आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.

पूर्वी जेथे एसटीचा डेपो होता त्याच ठिकाणी हे चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून ते मध्यवर्ती बस स्थानकापासून जवळ आहे. परिवहन मंडळाच्या वतीने मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ई-बसेसची सेवा सुरू करण्यात आली आहे.

Maharashtra E Bus
‍’एमपीएससी’ मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पर्यंत पुढे ढकला : मुख्यमंत्री

या बसेसच्या चार्जिंगसाठी राज्यातील १० एसटी स्थानकांमध्ये ५० चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहेत. तसेच ई बसेसना संग्रहित छायाचित्र प्रवाशांकडून चांगली पसंती मिळत आहे. मोठ्या संख्येने प्रवासी या बसेसने प्रवास करत आहेत.

कोल्हापुरात ताराबाई पार्क येथील एसटी कॉलनी आवारात ई बसेसच्या चार्जिंग स्टेशनसाठी स्वतंत्र डेपो व चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती विभागीय नियंत्रकांनी दिली. ई बसेससाठी चार्जिंग पॉईंटसाठी ११, २२ व ३३ के. व्ही. क्षमतेची उच्च दाबाची वीजजोडणी आवश्यक असते. एका बसला चार्ज होण्यासाठी सुमारे तीन तास लागतात. पूर्ण चार्ज झाल्यानंतर ही बस ३०० किलोमीटरचा टप्पा गाठते.

ई बसेस मिळाव्यात ही आपली खूप दिवसांपासूनची मागणी आहे. १०० बसेस कोल्हापूरला मिळणार आहेत. या बसेसच्या चार्जिंगसाठी ताराबाई पार्क येथे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या चार्जिंग स्टेशनमध्ये १०० बसेसच्या चार्जिंगचे नियोजन करण्यात येईल.

- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news