Kolhapur News| सुप्रिया सुळेंचा खोटेपणा समोरासमोर दाखवू; खा.सुनील तटकरे

नेसरीत जनसन्मान यात्रेदरम्यान सुळेंवर जोरदार टीका
Kolhapur News
सुप्रिया सुळेंचा खोटेपणा समोरासमोर दाखवू; खा.सुनील तटकरे File Photo
Published on
Updated on

गडहिंग्लज: दोन दिवसांपूर्वी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांनी गडबड करायला नको होती. आम्ही सगळे द्यायला तयार होतो. मात्र पक्ष फोडून त्यांनी चूक केली असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी सर्व द्यायला तयार होतो हा त्याचा धादांत खोटेपणा असून, या विषयावर समोरासमोर जाऊन उत्तर देण्यास मी तयार आहे, त्यांचा खोटेपणा सर्वांसमोर उघडू करु; असे स्पष्ट शब्दात सुनावले.

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेवेळी जनतेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी सुळेंनी मुश्रीफांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना पालकमंत्री मुश्रीफ हे अमित शहांना पोहोचवायला गेले होते. यावर टीका करणार्‍यांनी मनमोहन सिंगाचे सरकार असताना अरविंद केजरीवालांनी त्यांच्या मंत्रिमंडळावर किती टीका केली होती. हे माहित असताना त्याच केजरीवालांच्या बैठकांना जे उपस्थित राहतात, त्यांनी भान ठेवायला हवे.

अमित शहा हे देशाचे कणखर नेतृत्व असून, त्यांच्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ भेटण्यास गेले त्यावर टीका करण्याची गरज नव्हती. हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी वाढीसाठी प्रचंड मेहनत केली असून, त्यांनी लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयानंतर पोटशूळ उठल्याने त्यांच्यावर टीका केली जात असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. राजेश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत जयसिंग चव्हाण यांनी केले.

आम्ही गोट्या खेळायला आलो नाही: उपमुख्यमंत्री पवार

नेसरीच्या सभेत अजित पवार यांच्या मिश्कील स्वभावाचा अनुभव आला. माझे उपमुख्यमंत्री पदाचे रेकॉर्ड कुणीही मोडू शकणार नाही. विरोधक आम्ही घेतलेल्या विविध योजनांबाबत राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत गैरसमज पसरवित आहेत. मी काय आज सरकार चालवत नसून, तिथे गोट्या खेळायला गेलो नाही, असे म्हणताच उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news