

कोल्हापूर : शिवभोजन चालकांचे थकीत अनुदान त्वरित द्यावे, या मागणीसाठी शिवभोजन चालकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
राज्य सरकारने सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे गोरगरिबांची चांगली सोय झाली आहे; मात्र गेली सहा महिने या शिवभोजन चालकांचे अनुदान मिळाले नाही. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी निदर्शने करून थकीत अनुदान त्वरित देण्याची मागणी केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात किशोर आयरेकर, महेश पाटील, उमेश पोर्लेकर, प्रदीप माने, शीतल तिवडे, अमित सोलापुरे यांच्यासह शिवभोजन चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.