

कोल्हापूर/शिरोली : भरधाव ट्रॅक्टरची धडक बसून पुलाची शिरोली येथील अनंत ऊर्फ बंटी नामदेव दरेकर (वय 40) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान पुणे-बेंगळूर महामार्गावर टोप येथे घडली.
दरेकर हे टोप येथे बहिणीकडे गेले होते. सायंकाळी गावी जाण्यासाठी ते महामार्गालगत थांबले असता वाठारकडून आलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची त्यांना जोराची धडक बसली. ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रॅक्टर-ट्रॉलीसह पळ काढला. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दरेकर यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवला. दरेकर यांच्या मागे आई, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे.