

पेठवडगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणार्या 62 लाखांच्या गुटख्यासह तस्करी करणारा कंटेनर असा एकूण 78 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जयसिंगपूर व वडगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.
गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील यांना खबर्यामार्फत कर्नाटकातून गुटखा भरलेला कंटेनर मुंबईकडे जाणार असल्याचे समजले. त्यांनी जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना ही माहिती कळवून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल. यानुसार जयसिंगपूर विभागीय पोलिसांचे पथक व वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे, अनिल अष्टेकर यांच्या पथकाने किणी टोल नाक्याजवळ सापळा रचला. दुपारी दोनच्या सुमारास खबर्यामार्फत माहिती मिळालेला संशयित कंटेनर (क्रमांक एम एच 03 सिव्हि 3017) नाक्याजवळ अडविण्यात आला. चालकाने सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.