

कोल्हापूर : सोने-चांदीच्या दरातील दरवाढीची चढती कमान कायम आहे. सोमवारी (दि. 6) सोने-चांदीने जुने विक्रम मोडीत काढत पुन्हा दराचा नवीन उच्चांक गाठला.
दसर्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी 1 लाख 21 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमवर असलेल्या सोन्याच्या दरात चार दिवसांत 1 हजार 800 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे 24 कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर आता 1 लाख 22 हजार 800 रुपये प्रति 10 ग्रॅम या नव्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. चांदीचा ‘वाढता वाढता वाढे’ क्रम कायम असून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 1 ऑक्टोबरला 1 लाख 50 हजार 200 रुपये प्रति किलो असणार्या चांदीच्या 2,600 रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीसह दर आता 1 लाख 52 हजार 800 झाला आहे.
जीएसटीशिवाय दर
सोने 1,19,220 (प्रति 10 ग्रॅम)
चांदी 1,48,350 (प्रति किलो)