तुमच्या घराच्या दारावर कुणी लाथा मारल्या तर त्याची आरती करणार का?

गायत्री राऊत यांचा भारती पवारांना टोला; राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित
Gayatri Raut
गायत्री राऊत
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर ः तुमच्या घरात कौटुंबिक सुरू असलेल्या कार्यक्रमात सर्वजण जेवत असताना तुमच्या घराच्या दारावर शेजार्‍याने येऊन लाथा मारल्या तर तुम्ही दारात जाऊन त्याची आरती केली असता का, असा सवाल भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस गायत्री राऊत यांनी काँग्रेसच्या भारती पवार यांना केला.

महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ अक्कमहादेवी मंडपात झालेल्या मेळाव्यात राऊत बोलत होत्या. जुने उकरून काढून तुम्ही कितीही खोटे आरोप केले तरी राजेश क्षीरसागर यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळेच विरोधक हवालदिल होऊन खोटे आणि दिशाभूल करणारे आरोप करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राजेश क्षीरसागर यांचा स्वभाव रांगडा, पण...

काल भारती पवार यांनी केलेल्या आरोपास गायत्री राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांचे व्यक्तिमत्त्व सर्वांना चांगलेच माहीत आहे. त्यांचा स्वभाव रांगडा असला तरी उगाचच कोणाच्या अंगावर धावून जाणे त्यांच्या रक्तात नाही. त्यावेळी नेमके काय झाले, याची माहिती घ्यावी; मग पवार यांनी आपले तोंड उघडावे, असा पलटवार राऊत यांनी केला.

जयप्रभा स्टुडिओसंदर्भात विरोधकांकडून दिशाभूल...

भाजप प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, राजेश क्षीरसागर यांनी यापूर्वीच जयप्रभा स्टुडिओविषयी जाहीर खुलासा केला आहे. या ठिकाणी बांधकाम प्रकल्प होणार, अशी आवई उठवणार्‍या विरोधकांनी जयप्रभा स्टुडिओला एकदा भेट द्यावी आणि वस्तुस्थिती जाणून घ्यावी. उगाचच साप साप म्हणून जमीन बडवू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. आपण काही करायचे नाही आणि दुसर्‍याने केले तर बघवत नाही, ही काँग्रेसची जुनी सवय आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांपासून गल्लीबोळातील नेत्यांच्या अंगवळणी खोटे बोलण्याची सवय जडली आहे. स्वतः काय केले हे सांगण्यासाठी काही नसल्याने विरोधक विकासकामावर बोलण्याऐवजी नको ते मुद्दे उकरून काढत आहेत. विरोधकांनी वैयक्तिक पातळीवर येऊन बोलणे थांबवावे; अन्यथा आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही जाधव यांनी दिला. यावेळी अशोक देसाई, विशाल शिराळकर, पद्माकर कापसे, रविकिरण गवळी, संतोष माळी, महेश यादव, अमर साठे, हेमंत आराध्ये, संगीता खाडे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news