कोल्हापूर : सोने 80 हजार, तर चांदी 91 हजार पार

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठे फेरबदल
Big changes in gold and silver rates again
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठे फेरबदलPudhari File Photo
Published on
Updated on

कोल्हापूर : देशात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठे फेरबदल होत आहेत. आयात शुल्क कमी केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, गणेशोत्सवापासून सोन्या-चांदीच्या दरात लागोपाठ वाढच होत आहे.

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा जीएसटीसह दर 79 हजार 900 रुपये या उच्चांकी पातळीवर पोहोचला; तर चांदीचा भावही 91 हजार 200 रुपये प्रतिकिलो झाला. जीएसटी वगळता सोन्याचा दर 74 हजार 660, तर चांदीचा दर 88 हजार 540 रुपये आहे. 25 ऑगस्ट रोजी सोन्याचा जीएसटीसह दर 73 हजार 700 रुपये होता. एक महिन्यात त्यात तब्बल 4 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे; तर चांदीचा जीएसटीसह दर 87 हजार 400 रुपये होता. त्यात वाढ होऊन मंगळवारी 91 हजार 200 वर पोहोचला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news