कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसकडून काेल्हापुरातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ आज एकाच वेळी ८१ प्रभागात आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासक राज्यात कोल्हापूरच्या रस्त्यांची वाताहात झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचा धिक्कार करणाऱ्या घोषणा काॅँग्रेसकडून देण्यात आल्या.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात आयआरबीचे रस्ते सोडता एकही चांगला रस्ता दाखवण्यासाठी सुद्धा नाही. बहुतांश रस्त्याची चाळण झाली आहे. काही रस्ते अजून पूर्ण होण्याअगोदरच या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. गाडीवरून सोडा या रस्त्यावरून अनेक रस्त्यावरून नीट चालताही येत नाही. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
काँग्रेस पक्षाच्यावतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी कसबा बावडा लाईन बाजार परिसरात शुगर मिल - प्रिन्स शिवाजी शाळा चौक, कसबा बावडा, पूर्व बाजू - शाहू सर्कल चौक, कसबा बावडा हनुमान तलाव-आंबेडकरनगर चौक, कसबा बावडा, लाईन बझार - ४ नं. फाटक, लक्ष्मी विलास पॅलेस - स्वस्तिक चौक, पोलीस लाईन - लाईन बझार चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
झालं डांबर मुरूमही झाला, खड्यानं कणाच उरला नाही पाठीला अशा प्रशासनाच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.