संभापूर येथे अल्पवयीन मुलीची छेड काढून केला घरावर हल्ला

हल्ल्यामध्ये दोघे जखमी; २८ जणांवर गुन्हा दाखल
A minor girl was molested in Sambhapur and the house was attacked
संभापूर येथे अल्पवयीन मुलीची छेड काढून केला घरावर हल्ला Pudhari File Photo
Published on
Updated on

शिरोली एमआयडीसी : पुढारी वृत्तसेवा

संभापूर येथे शाळकरी मुलीचा रस्ता आडवून तिची छेड काढल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.23) समोर आली. या घटनेनंतर पीडित मुलीच्या भावाने संबधित मुलाला असे का केल्याची विचारणा केली. यानंतर जाब का विचारला या रागामुळे संबंधित मुलाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काठ्या, लोखंडी गज, कुऱ्हाड आणि विळ्यसारखी हत्यारे घेऊन पीडित मुलीच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. हि घटना रात्री ९ वाजण्यासुमार घडली. यानंतर पोलिसांनी हल्ल्यामध्ये सामील असणाऱ्या 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

A minor girl was molested in Sambhapur and the house was attacked
Nashik | निफाडला शालेय मुलींची छेड काढणार्‍या रोडरोमिओंना दिला चोप

याबाबत पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश संभाजी आणुसे आणि अर्जुन भगवान कारंडे हे अल्पवयीन मुलगीला शाळेला एकटी जाताना तिच्या समोर मोटरसायकल आडवी मारून तिला वाटेत अडवून त्या मुलीची छेड काढली. तु जर मी सांगितलेले केले नाहीस तर तुझ्या भावाला मी काय पण सांगणार अशी धमकी देवून ते दोघे तेथून निघून गेले. या नंतर पुन्हा त्यांनी मुलीला त्रास दिला. त्यावर मुलीने प्रतिकार करत तुम्ही मला त्रास देताय असे भावला सांगेन असे सांगितले. यानंतर तु कोणालाही सांग आम्ही कोणाला घाबरत नाही असे म्हणून तेथून निघून गेले.

A minor girl was molested in Sambhapur and the house was attacked
सव्वा तासाच्या विमान प्रवासात डॉक्टर महिलेची पाचवेळा छेड

यानंतर मुलीने घडलेला प्रकार तिच्या भावाला सांगितला. यानंतर तिच्या भावाने याबाबत आकाश आणुसे व अर्जुन कारंडे यांच्याकडे विचारणा करत असताना ते मोटरसायकल टाकून पळून गेले. यानंतर मुलीच्या भावाने त्यांची मोटरसायकल घरात आणून लावली. या घटनेनंतर आकाश संभाजी आणुसे, अर्जुन भगवान कारंडे, प्रकाश संभाजी आणुसे, सुजय संजय कारंडे, काशिनाथ कारंडे, राज कटटमन्त्री-माने, रोहित जगन्नाथ कारंडे, किरण रावसाहेब आणुसे, अमोल रावसाहेब आणुसे, शुभम विष्णु डांगे, कुलदिप भारत कारंडे, . सुरज भारत कारंडे, अक्षय अशोक कारंडे, गौरव नामदेव कारंडे, राजवर्धन संदिप बंडगर, अंकुश शामराव कारंडे, सुरज परमेश्वर थोरात, अविनाश आकाराम कारंडे, उदय वाकसे सर्व रा. संभापूर व इतर ८ ते १० अनोळखी लोकांनी हातामध्ये विविध प्रकारची हत्यारे घेत मुलीच्या घरामध्ये घुसून धमकी देत यश प्रकाश भोसले (वय १७ ) आणि तानाजी बबन भोसले यांना शिवीगाळ करत मारहाण केली. यानंतर फिर्यादी यांच्या सासु, दिर यांना ढकलून दिले व घरावर दगडफेक करून खिडकीचे काचा फोडून नुकसान केले. यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या लोकांनाही मारुन गंभीर जखमी केले. याबाबत शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात साधना प्रकाश भोसले यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुमारे २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news